brand-logo

Cotton crop training and seminars : कापूस पिक प्रशिक्षण आणि चर्चासत्र कार्यक्रम

कापूस पिक प्रशिक्षण आणि चर्चासत्र कार्यक्रम कृषि विज्ञान केंद्र नंदुरबार येथे
दि. 01 जून 2024

Cotton Field

कापूस पिक सल्ला: झाडांची अतिरिक्त कायिक वाढ रोखण्यासाठी पीक 75 ते 90 दिवसेचे झाल्यावर शेंडा खुडावा किंवा क्लोरमेक्वाट क्लोराईड (५० एसएल) हे वाढ नियंत्रक ०.४ मि.लि. प्रति लिटर पाण्यात मिसळून नॅपसॅक पंपाने फवारणी करावी. फुले व पात्या यांची गळ होऊ नये, यासाठी नॅप्थील अॅसेटिक अॅसिड (एन.ए.ए.) या संजीवकाची ३ ते ४ मि.लि. प्रति १५ लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.
👉🏻 फरदड घेणे टाळा: साधारणतः कापूस हंगामाच्या मध्यापासून (साधारणतः लागवडीच्या ९० दिवसांपासून पुढे) गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव सुरू होतो व शेवटपर्यंत हळूहळू वाढत जातो. ही कीड बोंडामध्ये लपून राहत असल्यामुळे वरून सहजासहजी प्रादुर्भाव दिसून येत नाही. परिणामी लांबलेल्या हंगामानुसार बोंडांवरील प्रादुर्भावआणि त्यामुळे होणारे कपाशी व बियांचे नुकसानही वाढत जाते. आदर्श पीक पद्धतीमध्ये कपाशीचा हंगाम डिसेंबरच्या शेवटी किंवा जास्तीत जास्त जानेवारीच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत संपवला पाहिजे. त्यानंतर शेतातील पिकाचे अवशेष काढून नष्ट करावे. अळीला खाण्यासाठी पिकाचा अभाव व हिवाळ्यातील थंड तापमान यामुळे अळ्या निसर्गतः सुप्तावस्थेत जातात. सुप्तावस्थेतील अळ्या प्रादुर्भावग्रत बोंडे व पिकाचे अवशेष यामध्येच लपून राहतात. पीक काढणीनंतर शेतात गुरे, शेळ्या-मेंढ्या चरावयास सोडाव्यात. पहाटीचे अवशेष जाळून टाकावेत. ट कोणत्याही कारणास्तव वेचणीनंतर शेतात कपाशीचे पीक तसेच ठेवणे किंवा कपाशी पिकांचे अवशेष साठवणे टाळावे. अशी तजवीज केल्यामुळे खाद्य पुरवठ्याअभावी गुलाबी बोंडअळीचा जीवनक्रम खंडित होतो. पुढील हंगामातील प्रादुर्भाव रोखण्यास मदत होते.

डॉ. हेडगेवार सेवा समिती: कृषि विज्ञान केंद्र, कोळदा, नंदुरबार येथे दि. 01 जून 2024 वार शनिवार रोजी कापूस पिक प्रशिक्षण आणि चर्चासत्र आयोजित केले आहे...