डॉ हेडगेवार सेवा समिती नंदुरबार संचलित अनुदानित आश्रमशाळा जळखे ता.जि नंदुरबार यांचे विविध क्रीडा स्पर्धेत यश
विभागीय खो-खो क्रीडा स्पर्धा
जळखे आश्रमशाळेच्या 5 खेळाडूंची राज्यस्तरावर निवड
विभागीय खो-खो क्रीडा स्पर्धा
जळखे आश्रमशाळेच्या 5 खेळाडूंची राज्यस्तरावर निवड


डिसेंबर २०२४ | नाशिक: आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य आयोजित नासिक विभागीय क्रीडा स्पर्धा नाशिक येथील मीनाताई ठाकरे क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आल्या या स्पर्धेत डॉ.हेडगेवार सेवा समिती नंदुरबार संचलित अनुदानित आश्रमशाळा जळखे ता.जि. नंदुरबार येथील 14 वर्षा आतील मुलींचा नंदुरबार प्रकल्पाच्या खो खो संघाने विजेतेपद प्राप्त केले.या संघात आश्रमशाळा जळखे येथील 5 खेळाडूंचा समावेश होता तर 10 खेळाडू शासकीय आश्रमशाळा वडकळंबीचे होते.17वर्षे आतील मुलींच्या जळखे आश्रमशाळेचा खो खो संघ अंतिम सामन्यात उपविजयी राहिला. शाळेतील एकूण 17 खेळाडूंनी विभागीय स्पर्धेत सहभाग नोंदवला. नागपूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पूजा कोकणी , लक्ष्मी गावित, अयोध्या वसावे, शालिनी कोकणी, वैदही वळवी या 5 खेळाडूंची निवड झाली. निवड झालेल्या सर्व खेळाडूंचे संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी , आश्रमशाळेचे मुख्याध्यापक प्रवीणकुमार सोनवणे, प्रमोद सूर्यवंशी व सर्व विकास सहयोगीनी कौतुक केले.पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सर्व खेळाडूंना खो खो प्रशिक्षक अनिल रौंदळ यांचे मार्गदर्शन लाभले..
विशेष माहिती: जळखे आश्रमशाळेच्या 5 खेळाडूंची राज्यस्तरावर निवड झाल्यामुळे सर्वच स्तरावरून कौतूकाचा वर्षाव होत आहे
विभागीय आट्या पाट्या क्रीडा स्पर्धा

डिसेंबर २०२४ | नाशिक: नाशिक विभागीय आट्या पाट्या क्रीडा स्पर्धा जळगांव येथे संपन्न झाली त्यात डॉ हेडगेवार सेवा समिती नंदुरबार संचलित अनु. आश्रमशाळा जळखे येथील विदयार्थ्यांनि नाशिक ग्रामीण संघाला हरवून 3 rd place मिळवली त्याबद्दल सर्व विध्यार्थ्यांचे अभिनंदन
विशेष माहिती: नाशिक ग्रामीण संघाला हरवून 3 रे स्थान मिळवले