केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री नामदार श्री. संजयजी सेठ Sanjay Seth यांनी डॉ. हेडगेवार सेवा समिती नंदुरबार च्या कृषी विज्ञान केंद्र ला सदिच्छा भेट दिली.
दि. 26 डिसेंबर 2024
दि. 26 डिसेंबर 2024

गुरुवार दिनांक 26 डिसेंबर २०२४ | नंदुरबार: केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री नामदार श्री. संजय जी सेठ Sanjay Seth यांनी डॉ. हेडगेवार सेवा समिती नंदुरबार च्या कृषी विज्ञान केंद्र ला सदिच्छा भेट दिली. या प्रसंगी मंत्री महोदयांचे अध्यक्ष म्हणून शाल पुष्पगुच्छ व बैलगाडी देवून स्वागत केले. त्यांनी यावेळी कृषी प्रक्षेत्र, कम्युनिटी रेडिओ स्टेशन, कृषी प्रदर्षनी, कृषी उद्योग, सेंद्रीय शेती या युनिट्स ला भेट दिली. सेवा समिती मार्फत समाजपयोगी व शेतकर्यांना उपयुक्त अशा प्रशिक्षण व अन्य कार्यक्रमांची प्रशंसा केली. रेडिओ स्टेशन वरुन सेंद्रीय शेती संदर्भात शेतकर्यांना आवाहन करतांना मा. पंतप्रधान नरेंद्र जी मोदींनी शेतकर्यांसाठी आणलेल्या योजनांचा लाभ घेण्यासाठी मार्गदर्शन केले.
कृषी विज्ञान केंद्र व डॉ. हेडगेवार सेवा समिती समाजातील सर्व घटकांना जोडुन लोकसहभागातून करीत असलेल्या कार्यांचा उल्लेख करत शुभेच्छा देतांना नंदुरबार जिल्ह्यात एक आदर्श निर्माण करण्यात सफलता प्राप्त केली आहे.
विशेषतः मिरची व आमचुर यास GI मानांकन प्राप्त झाले बद्दल तसेच सिताफळ चे आईस्क्रीम तयार करणार्यां FPO चे कौतुक केले.
विशेष माहिती: यावेळी मंत्री महोदयांनी कृषी संबंधित घडी पत्रिकेचे अनावरण केले.