लागवड आणि दादा लाड तंत्रज्ञानाने जिल्ह्यात
होतेय कापूस उत्पादनात वाढ, भूलाणे ता.शहादा येथे शेतदिन साजरा
दि. 07 डिसेंबर 2024
दि. 07 डिसेंबर 2024

भारतीय कृषि अनुसंधान परिषद, केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर व डॉ. हेडगेवार सेवा समिती, कृषि विज्ञान केंद्र, कोळदा यांच्या विशेष कापूस प्रकल्पाअंतर्गत सघन पद्धतीने कापूस लागवड करून दादा लाड तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला.
कार्यक्रमाची प्रमुख उपस्थिती:
शांताराम खर्डे – सरपंच, भूलाने
श्री. पद्माकर कुंदे – प्रकल्पाचे नोडल अधिकारी व पिक संरक्षण तज्ञ
डॉ. वैभव गुरवे – विषय विशेषज्ञ, उद्यानविद्या
श्री. मनोज खैरनार – मंडळ कृषि अधिकारी
संदिप कुवर (YP-II) – प्रकल्प समन्वयक
कार्यक्रमाचा मुख्य उद्देश: शेतकऱ्यांना कापसाच्या सघन लागवडीतील दादा लाड तंत्रज्ञान समजावून देणे आणि उत्पादनवाढीसाठी योग्य तंत्रांचा अवलंब करण्यास प्रोत्साहन देणे.
प्रमुख मार्गदर्शन: श्री. पद्माकर कुंदे यांनी सघन पद्धतीने कापूस लागवड (3 x 1 फूट अंतराने) करण्याची माहिती दिली. त्यांनी झाड नियमनासाठी गळफांदी काढणे (44-50 दिवसांनी) आणि शेंडा खुडणे (90 दिवसांनी) या तंत्रज्ञानाचा उपयोग कसा करावा हे सविस्तर सांगितले.
डॉ. वैभव गुरवे यांनी कापसाच्या काढणीनंतरच्या तंत्रज्ञानाबरोबरच भाजीपाला साठवणीसाठी कमी खर्चिक उपाययोजनांवर भर दिला.
श्री. मनोज खैरनार यांनी कृषि विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली, ज्यातून शेतकऱ्यांना आर्थिक लाभ व तांत्रिक मदत मिळू शकते.
श्री. संदिप कुवर यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध प्रकल्पांची माहिती दिली व कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले.
शेतकऱ्यांच्या अनुभवांचा समावेश: यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी दादा लाड तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यामुळे उत्पादनात दीड पट वाढ झाल्याचे अनुभव कथन केले. प्रात्यक्षिके व प्रकल्प विस्तार: नंदुरबार, शहादा, तळोदा व नवापूर तालुक्यांमध्ये सघन कापूस लागवड तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिके घेण्यात आली आहेत. या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष लाभ होत आहे व उत्पादन वाढीसाठी नवे मार्ग खुले होत आहेत.

विशेष माहिती: डॉ. हेडगेवार सेवा समिती अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र,
कोळदा, नंदुरबार येथे 18 वा कृषी तंत्रज्ञान महोत्सव दिनांक 16 ते 21 डिसेंबर 2024 दरम्यान आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी संधीचे सोने करावे व आपल्या शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडून उत्पादनवाढ साध्य करावी.