brand-logo

अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा, जळखे ता.जि.नंदुरबार : रौप्यमहोत्सवी वर्ष

डॉ. हेडगेवार सेवा समिती नंदुरबार, संचलित अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा, जळखे ता.जि.नंदुरबार , शैक्षणिक वर्ष २०२३-२४ हे वर्ष शाळेचे रौप्यमहोत्सवी वर्ष होते, शैक्षणिक कार्यशाळा, क्रिडामहोत्सव, शारदोत्सव, माजी विद्यार्थी मेळावा, मातृ-पितृ पूजन हे कार्यक्रम करण्याचे निश्चित करण्यात आले. शैक्षणिक कार्यशाळेला मा. सदाशिव चव्हाण (सामाजीक कार्यकर्ते, मुंबई) माजी विद्यार्थी मेळाव्याला मा. प्रकाशजी पाठक, मातृ-पितृ पूजन या कार्यक्रमासाठी मा.स्वर्णिमा महाले (न्यायमूर्ती) अशा दिग्गज मान्यवरांचा सहवास शाळेला मिळाला. वर्षभरात क्रिडाक्षेत्रात शाळेतील मुलींनी शाळेचे नाव सर्वदूर नेले. खो-खो खेळानिमित्त मुलींचा नंदुरबार, शहादा, नाशिक, पालघर इ. ठिकाणी प्रवास झाला. प्रत्येक ठिकाणी जाऊन आपल्या मेहनतीने व क्रिडाकौशल्याने विजयाची ट्राफी घेऊनच मुली शाळेत परतल्या. प्रवासाहून परतणाऱ्या मुलींचे स्वागत शाळेने प्रचंड टाळ्या वाजवून कले. खेळाडू मुलीनी आंनदाने प्रतिसाद दिला. हा क्षण मोरपिसासारखा कायमस्वरूपी हृदयात जतन करून ठेवला. खेळाडू मुलींनी अन् शाळेनेही !

15 जून 2024 रोजी शाळा प्रवेशोत्सव व नवागतांचे स्वागत उत्साहात

डॉ हेडगेवार सेवा समिती नंदुरबार संचलित अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा जळखे ताजि नंदुरबार येथे आज दि.15 जून 2024 रोजी शाळा प्रवेशोत्सव व नवागतांचे स्वागत उत्साहात संपन्न झाले.या प्रसंगी संस्थेचे विश्वस्त मा.सुखदेव आप्पा माळी,मा.धनराज कातोरे, प्रकल्प कार्यालय नंदुरबार येथील मा.निवृत्ती राठोड, सरपंच सौ.देखमुताई गावीत, सदस्य सौ.मनिषा वसावे,पालक, विद्यार्थी व सर्व विकास सहयोगी उपस्थित होते.यावेळी प्रवेशोत्सव दिंडी, नवागतांचे स्वागत, पाठ्यपुस्तके वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी मा.सुखदेव आप्पा यांनी उपस्थित पालकांना मार्गदर्शन केले.शेवटी मिष्ठान्न भोजनाचा आस्वाद घेत कार्यक्रमाची सांगता झाली.