मौजे वडझाकण येथे शाळेच्या वतीने गाव भेट उपक्रम
दि.20/6/2024 मौजे वडझाकण ता.जि नंदुरबार : डॉ हेडगेवार सेवा समिती नंदुरबार संचलित अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा जळखे ताजि नंदुरबार तर्फे संस्था व शाळेच्या वतीने गाव भेट उपक्रम मौजे वडझाकण ताजि नंदुरबार येथे दि.20/6/2024 रोजी सायंकाळी आयोजित करण्यात आला.या कार्यक्रमाला संस्थेचे विश्वस्त मा.धनराज कातोरे,मा.यशपाल पटेल, सदस्य मा.संजय पाटील, प्रशासकीय अधिकारी मा.उमेश शिंदे,शाळेचे विकास सहयोगी,आजी माजी विद्यार्थी व पालक,ग्रा.पं.सरपंच व सदस्य तसेच माजी पोलीस पाटील उपस्थित होते.वडझाकण येथील हनुमान मंदीरात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमात संस्था परीचय प्रशासकीय अधिकारी उमेशजी शिंदे यांनी करून दिला.यामध्ये कृषि विज्ञान केंद्र कोळदा,जनशिक्षण संस्थान 1 नंदुरबार, संस्थेचे विविध प्रकल्प यांची माहीती देत त्यांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.यानंतर विश्वस्तांनी पालकांशी व विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधत शाळेच्या कामकाजात सहकार्य करण्याचे आवाहन केले व सर्वांच्या सहभागातून शाळा व विद्यार्थी हित साधता येईल असे सांगितले.माजी विद्यार्थ्यांनी सर्वांचा हृदय सत्कार केला तसेच कार्यक्रमानंतर पाहुण्यांच्या भोजनाची व्यवस्था माजी विद्यार्थी प्रकाश दळवी यांनी केली.
प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत जागतिक योग दिवस उत्साहात संपन्न
दि.21/6/2024 जळखे ता.जि नंदुरबार : डॉ हेडगेवार सेवा समिती नंदुरबार संचलित अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा जळखे ताजि नंदुरबार येथे आज जागतिक योग दिवस साजरा करण्यात आला.यावेळी सर्व विद्यार्थी व विकास सहयोगी यांनी योग प्रात्यक्षिके, प्राणायाम शाळेतील शिक्षक श्री नरेंद्र मराठे व श्री योगेश निकुंभ यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले.