जळखे येथे उपनगर पोलिस स्टेशन नंदुरबार तर्फे पोलिस रायझिंग डे निमित्त शस्त्र प्रदर्शनाचे आयोजन जळखे येथे उपनगर पोलिस स्टेशन, नंदुरबार यांच्या वतीने पोलिस वर्धापन दिन अर्थात पोलिस रायझिंग डे निमित्त शस्त्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. आज दिनांक ५ जानेवारी २०२६ रोजी डॉ. हेडगेवार सेवा समिती, नंदुरबार संचलित अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा, जळखे, ता. व जि. नंदुरबार येथे २ जानेवारी ते ९ जानेवारी २०२५ या कालावधीत पोलिस रायझिंग डे सप्ताह साजरा करण्यात आला. या कार्यक्रमानिमित्त उपनगर पोलिस स्टेशन नंदुरबार येथील सहाय्यक पोलिस निरीक्षक मा. संजोग बच्छाव साहेब, पोलिस उपनिरीक्षक मा. पाटील साहेब व त्यांच्या सहकाऱ्यांनी शाळेला भेट दिली. यावेळी इयत्ता ६ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांना पोलिस दलामध्ये वापरल्या जाणाऱ्या विविध शस्त्रांची सविस्तर माहिती देण्यात आली. शस्त्रांचा वापर कधी, कसा व कोणत्या परिस्थितीत केला जातो, याबाबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांसह अनमोल मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी यावेळी रायफल, पिस्तूल, बुलेट (गोळ्या), अश्रुधुराच्या नळकांड्या आदी शस्त्रे अगदी जवळून पाहिली व प्रत्यक्ष अनुभव घेतला. या संपूर्ण उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पोलिस दलाबाबत उत्सुकता व आदरभाव निर्माण झाला. कार्यक्रमाच्या वेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. प्रवीणकुमार सोनवणे, श्री. अनिल रौंदळ तसेच सर्व विकास सहयोगी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. प्रमोद सूर्यवंशी यांनी अत्यंत उत्तमरीत्या केले. हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी ज्ञानवर्धक व प्रेरणादायी ठरला. संपूर्ण बातमी वाच
* नंदुरबार जिल्ह्यातील पहिला सोयाबीन प्रक्रिया उद्योग कार्यान्वित ...... महिला बचत गटाच्या सोयाबीन प्रक्रिया उद्योगाचा शुभारंभ जिल्हाधिकारी मा.डॉ.मित्ताली सेठी यांच्या हस्ते उद्घाटन नंदुरबार | प्रतिनिधी राष्ट्रीय कृषि व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) पुरस्कृत व डॉ. हेडगेवार सेवा समिती, नंदुरबार संचलित पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत मौजे श्रावणी, ता. नवापूर, जि. नंदुरबार येथे महिला बचत गटाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या सोयाबीन प्रक्रिया उद्योगाचा उद्घाटन समारंभ उत्साहात पार पडला. या उद्योगाचे उद्घाटन जिल्हाधिकारी मा. डॉ. मित्ताली सेठी यांच्या शुभहस्ते प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी त्यांनी संपूर्ण प्रकल्पाची सविस्तर माहिती जाणून घेत प्रकल्पाची कार्यपद्धती समजून घेतली तसेच युनिटची पाहणी केली. या सोयाबीन प्रक्रिया उद्योगासाठी कृषि विज्ञान केंद्र, नंदुरबारचे तांत्रिक सहकार्य लाभले. या कार्यक्रमास व्यासपीठावर जिल्हा नियोजन अधिकारी शशांक काळे, नाबार्ड जिल्हा विकास प्रबंधक (DDM) श्री.रविंद्र मोरे, डॉ. हेडगेवार सेवा समितीचे अध्यक्ष श्री. केदारनाथ कवडीवाले, जिल्हा अग्रणी बँकेचे अधिकारी श्री. नंदकुमार पैठणकर तसेच पाणलोट क्षेत्र विकास समिती, श्रावणीचे अध्यक्ष श्री. संदीप कोकणी आदी मान्यवर उपस्थित होते. स्थानिक कृषी उत्पादनावर प्रक्रिया केल्यास त्यापासून चांगला फायदा शेतकऱ्यांना मिळू शकतो. नंदुरबार जिल्ह्यात यासाठी अनेक संधी आहेत अशा संधीचा शेतकऱ्यांनी आणि महिला बचत गटांनी लाभ घेऊन आर्थिक उन्नती साधावी असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी यावेळी केले. नाबार्डचे जिल्हा विकास प्रबंधक श्री रवींद्र मोरे यांनी महिला बचत गटाच्या या सोयाबीन प्रक्रिया उद्योगाचे कौतुक करीत व्यवसायात सातत्य ठेवून विक्री व्यवस्थापनावर भर द्यावा असे सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.हेडगेवार सेवा समितीचे अध्यक्ष श्री.केदारनाथ कवडीवाले यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी होत असलेल्या जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नांचे कौतुक केले. पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या घटकाचा विकास साधणाऱ्या एकात्म मानव दर्शनाच्या दृष्टीकोनातून कार्य करण्याची गरज व्यक्त केली. कार्यक्रमास मा. सायली वर्मा, सेंट्रल किचन, नंदुरबार, मा कोसे सर, प्राचार्य, नवोदय विद्यालय,श्रावणी, उमेदचे श्री यशवंत ठाकूर ,मा. राजेंद्र दहातोंडे, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख,कृषी विज्ञान केंद्र, कोळदा, तालुका कृषि अधिकारी श्री. रवींद्र पाडवी, कृषि विज्ञान केंद्र ,नंदुरबार च्या गृहविज्ञान तज्ञ सौ.आरती देशमुख यांची उपस्थिती लाभली. श्रावणी गावातील महिला बचत गट ग्रामसंघाअंतर्गत विविध स्वयंरोजगार उद्योग सुरू करण्यात येत असून, त्याचाच एक भाग म्हणून हा सोयाबीन प्रक्रिया उद्योग उभारण्यात आला आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊन त्यांचे आर्थिक सक्षमीकरण होण्यास मोठी मदत होणार आहे. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ श्री. जयंत उत्तरवार यांनी नाबार्डच्या या पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत झालेल्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. प्रफुल्ल पवार केले. श्रावणी येथील बचत गटाच्या महिलांनी स्वागत गीत सादर केले. यावेळी सोयाबीन पासून बनविलेल्या विविध प्रक्रिया पदार्थ तसेच कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले. यात प्रकल्पातील शेतकऱ्यांशी जिल्हाधिकाऱ्यांनी संवाद साधत पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमातील उपक्रमांचे फायदे जाणून घेतले. यावेळी डॉ. हेडगेवार सेवा समितीचे विश्वस्त श्री. यशपालभाई पटेल ,सौ. अर्चनाताई वळवी यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. हेडगेवार सेवा समिती, नंदुरबार, नाबार्ड प्रकल्प व कृषी विज्ञान केंद्र, कोळदा येथील संपूर्ण टीमने विशेष परिश्रम घेतले.
संपूर्ण बातमी वाच
दिनांक २२ डिसेंबर २०२५, सोमवार रोजी डॉ. हेडगेवार सेवा समिती, नंदुरबार संचलित अनुदानित प्राथमिक आश्रम शाळा, जळखे, ता. नंदुरबार, जि. नंदुरबार येथे ‘गणित दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हा दिवस महान भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे गणित शिक्षक श्री. आर. ए. पाडवी होते. कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून माध्यमिक मुख्याध्यापक श्री. प्रवीणकुमार सोनवणे, प्राथमिक मुख्याध्यापक श्री. अनिल रौंदळ तसेच सर्व विकास सहयोगी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये गणित विषयाबद्दल रुची निर्माण करणे, तसेच महान गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जीवनकार्याचा व त्यांनी मांडलेल्या विविध गणितीय सिद्धांतांचा विद्यार्थ्यांना परिचय करून देण्यात आला. विद्यार्थ्यांनी गणित गीते, गणितीय खेळ सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. गणित शिक्षक श्री. आर. ए. पाडवी यांनी गणित प्रश्न मंजुषा उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये गणिताविषयी गोडी निर्माण केली व त्यांना सक्रिय सहभागासाठी प्रोत्साहित केले. यावेळी माध्यमिक मुख्याध्यापक श्री. प्रवीणकुमार सोनवणे यांनी दैनंदिन जीवनातील गणिताचे महत्त्व स्पष्ट करत विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. सर्व विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहाने व आनंदी वातावरणात कार्यक्रमात सहभाग घेतला. कार्यक्रमाची सांगता ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रगीताने करण्यात आली. संपूर्ण बातमी वाच
दिनांक 22 डिसेंबर 2025 रोजी सौ. नबीबाबी माध्यमिक विद्यालय, ब्राम्हणपुरी येथील एकूण 45 विद्यार्थी व 2 शिक्षक यांनी कृषी विज्ञान केंद्र, कोळदा, ता. व जि. नंदुरबार येथे शैक्षणिक सहल... या सहलीदरम्यान विद्यार्थ्यांना आधुनिक शेती पद्धती, पीक व्यवस्थापन, माती परीक्षण, सेंद्रिय शेती, पशुपालन तसेच कृषी तंत्रज्ञानातील नविन प्रयोग यांची सविस्तर माहिती तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आली. प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांमुळे विद्यार्थ्यांना कृषी क्षेत्रातील वैज्ञानिक दृष्टीकोन समजण्यास मदत झाली. या शैक्षणिक सहलीमुळे विद्यार्थ्यांचे ज्ञानवर्धन, निरीक्षणशक्ती वाढ तसेच कृषी विषयाविषयी आवड निर्माण झाली. ही सहल अत्यंत उपयुक्त, माहितीपूर्ण व यशस्वी ठरली. संपूर्ण बातमी वाच
दिनांक 18.12.2025 रोजी नटावड, ता. जि. नंदुरबार येथील शेतकऱ्यांना आंबा व पेरू बागायतीतील पीक काळजी व व्यवस्थापनाबाबत शास्त्रीय मार्गदर्शन करण्याची संधी मिळाली. या मार्गदर्शन सत्रामध्ये बागायत पिकांवरील रोग व्यवस्थापनासाठी उपयुक्त ठरणाऱ्या बोर्डो पेस्ट तयार करण्याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक प्रशिक्षण घेण्यात आले. या प्रशिक्षणात बोर्डो पेस्टची योग्य रचना, प्रमाण, तयार करण्याची पद्धत तसेच प्रत्यक्ष शेतात वापरण्याची अचूक कार्यपद्धती शेतकऱ्यांना सविस्तरपणे समजावून सांगण्यात आली. हा कार्यक्रम नाबार्ड (NABARD) व युवा मित्र फाउंडेशन यांच्या सहकार्याने यशस्वीपणे पार पडला. कार्यक्रमादरम्यान शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग, जिज्ञासा व शिकण्याची तयारी उल्लेखनीय होती, ज्यामुळे हा उपक्रम अत्यंत परिणामकारक ठरला. शाश्वत शेतीचा प्रसार व शेतकरी सक्षमीकरणासाठी योगदान देण्याची संधी मिळाल्याबद्दल मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो. संपूर्ण बातमी वाच
विभागीय क्रीडा स्पर्धेमध्ये नंदुरबार प्रकल्पाच्या १७ वर्षांखालील मुलींच्या खो-खो संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत विजेतेपद पटकावले आहे. ही बाब नंदुरबार प्रकल्पासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे. या विजयी संघामध्ये अनुदानित आश्रम शाळा, जळखे येथील चार खेळाडूंचा समावेश असून, त्यांच्या मेहनतीने, शिस्तबद्ध सरावाने व संघभावनेने हे यश संपादन झाले आहे. खेळाडूंनी दाखवलेला आत्मविश्वास, चिकाटी आणि संघभावना निश्चितच प्रेरणादायी आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व खेळाडूंना, मार्गदर्शक शिक्षकांना व प्रशिक्षकांना मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा! 💐💐💐👏👏👏 संपूर्ण बातमी वाच
डॉ. हेडगेवार सेवा समिती संचलित कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबार आणि रीड्स भारत फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ११ व १२ डिसेंबर २०२५ रोजी भाजीपाला रोपवाटिका व्यवस्थापन या विषयावर दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख श्री. राजेंद्र दहातोंडे, प्रा. संदीप राजपूत (उद्यानविद्या विभाग), डॉ. भूषण बिरारी (रोगशास्त्र विभाग), रीड्स भारत फाऊंडेशनचे जिल्हा व्यवस्थापक श्री. किरण गोरे तसेच उद्यानविद्या तज्ज्ञ डॉ. वैभव गुर्वे उपस्थित होते. उद्घाटनपर भाषणात श्री. दहातोंडे यांनी स्थानिक पातळीवर भाजीपाला रोपे उपलब्ध झाल्यास वाहतूक खर्चात बचत होते व शेतकऱ्यांना दर्जेदार रोपे वेळेवर व सहज उपलब्ध होतात, असे प्रतिपादन केले. तांत्रिक सत्रांमध्ये प्रा. संदीप राजपूत यांनी रोपवाटिकेची मूलभूत तत्त्वे, परवाना प्रक्रिया व व्यावसायिक नैतिकता याबाबत मार्गदर्शन केले. डॉ. भूषण बिरारी यांनी रोपवाटिकेतील रोग व कीड व्यवस्थापनावर सविस्तर माहिती दिली. डॉ. वैभव गुर्वे यांनी प्रो-ट्रे रोपवाटिका तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक सादर करून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले. तसेच श्री. जयंत उत्तारवार यांनी रोपवाटिकेचे विविध प्रकार व पाणी व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले. प्रशिक्षणाचा एक भाग म्हणून वावद येथील बळीराजा नर्सरी येथे अभ्यासभेट आयोजित करण्यात आली. या वेळी श्री. भूषण पाटील यांनी रोपवाटिका उभारणी, येणारा खर्च व प्रत्यक्ष अडचणी याबाबत शेतकऱ्यांना माहिती दिली. संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन रीड्स भारत फाऊंडेशनचे समन्वयक श्री. राकेश खलाने यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री. किरण माराठे व श्री. कैलास सोनवणे यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाचे आभार श्री. देवसिंग वळवी यांनी मानले. संपूर्ण बातमी वाच
कृषी तंत्रज्ञान सप्ताहाचा समारोप सोहळा दिनांक १० डिसेंबर २०२५ रोजी KVK नंदुरबार येथे “आपले गाव – आपले पाणी” या विषयावर आयोजित परिषदेच्या माध्यमातून उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला मा. श्री के. आर. कवडिवळे, अध्यक्ष, Dr.HSS KVK नंदुरबार; डॉ. एन. व्ही. पांचभाई, सचिव, Dr.Hss KVK नंदुरबार; सौ. मिताली शेठी, जिल्हाधिकारी; श्री राजेंद्र कसार, अध्यक्ष, सुप्रभा प्रतिष्ठान, पुणे; डॉ. यू. बी. होळे, सहयोगी अधिष्ठाता, कृषी महाविद्यालय नंदुरबार; तसेच श्री पाटील भाऊ माळी, श्री एस. ए. पाटील, प्रगत शेतकरी व संचालक, Dr.HSS KVK नंदुरबार यांची मान्यवर उपस्थिती लाभली. समारोप कार्यक्रमाला मा. श्री के. आर. कवडिवळे, अध्यक्ष Dr. HSS नंदुरबार; डॉ. एन. व्ही. पांचभाई, सचिव Dr. HSS नंदुरबार; सौ. मिताली शेठी, जिल्हाधिकारी; श्री राजेंद्र कसार, अध्यक्ष सुप्रभा प्रतिष्ठान पुणे; डॉ. यू. बी. होळे, सहयोगी अधिष्ठाता, कृषी महाविद्यालय नंदुरबार; तसेच श्री पाटील भाऊ माळी, श्री एस. ए. पाटील, प्रगत शेतकरी व संचालक Dr. HSS नंदुरबार यांची मान्यवर उपस्थिती लाभली. विविध विभागांतील तज्ञ, प्रगतिशील शेतकरी आणि नंदुरबार जिल्ह्यातील मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या शेतकरी बांधवांमुळे कार्यक्रम अधिक अर्थपूर्ण आणि यशस्वी ठरला. संपूर्ण बातमी वाच
कृषि विज्ञान केंद्र, नंदुरबारतर्फे कृषी प्रक्रिया उद्योग व एफपीओच्या संधी, तंत्रज्ञान आणि शासकीय योजनांवर मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले. मूल्यवर्धन, गटशेती, ब्रँडिंग, प्रक्रिया उद्योग उभारणी आणि बाजारपेठेतील थेट प्रवेश याविषयी तज्जज्ञांनी उपयुक्त माहिती दिली. सत्रात अन्न प्रक्रिया, धान्य व फळ प्रक्रिया, सोया उत्पादने, सोलर/इलेक्ट्रिक ड्रायर, कोल्ड स्टोरेज, तसेच PMFME, MAVIM, SMART, MAGNET यांसारख्या योजनांची माहिती देण्यात आली. FPO/FPC स्थापनेचे फायदे आणि शेतकऱ्यांच्या नफ्यात होणारी वाढ यावर भर देण्यात आला. शेतकरी, महिला गट, विद्यार्थी यांचा उत्स्फूर्त सहभाग असून कार्यक्रमात जीवामृत, बिजामृत, घनजीवामृत व निमास्त्र यांचे प्रात्यक्षिकही घेण्यात आले. संपूर्ण बातमी वाच
भअनुदानित माध्यमिक आश्रमशाळा, जळखे नंदुरबार तालुक्यातील जळखे येथील डॉ. हेडगेवार सेवा समिती संचलित अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत भगवान बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्यात आला. कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष जाच्या बाबा पावरा, सरपंच देखमुबाई गावित, किशोर गावित, मुख्याध्यापक अनिल रौंदळ व विकासयोगी उपस्थित होते. जात्र्या पावरा यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी आदिवासी लोकगीत, भाषण व नृत्य सादर केले. सूत्रसंचालन नरेंद्र मराठे यांनी केले तर आभार महेंद्र निकवाडे यांनी मानले.
आज दि. १५ नोव्हेंबर २०२५ रोजी मोलगी येथे डॉ. हेडगेवार सेवा समिती संचलित "जन शिक्षण संस्थान नंदुरबार-१" अंतर्गत भगवान बिरसा मुंडा यांची १५० वी जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी मा. श्री. आपसिंग दादा वसावे तर प्रमुख वक्त्या मा. ॲड. सौ. गुलीताई वसावे उपस्थित होत्या. सर्वप्रथम दीपप्रज्वलन करून देवमोगरा माता व भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर साधनव्यक्ती रशीला, वसुंधरा, मंगला व रीमा यांनी स्वागत गीत सादर केले. संचालक श्री. संदिप बच्छाव यांनी प्रास्ताविक केले व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. प्रमुख वक्त्या मा. ॲड. सौ. गुलीताई वसावे यांनी भगवान बिरसा मुंडांच्या जीवनचरित्रावर व आदिवासी हक्कांच्या लढ्यावर प्रकाश टाकला.
संपूर्ण बातमी वाचा
प्रकाशा येथे अजवाइन पिकावर मध काढणी आणि परागीभवनासाठी अहिल्यानगर येथील मधमाशी पालकाचे प्रात्यक्षिक....
संपूर्ण बातमी वाचा
दि. 11/11/2025 केंद्रीय कापूस संशोधन संस्था,नागपूर तसेच डॉ. हेडगेवार सेवा समिती, कृषि विज्ञान केंद्र , नंदुरबार येथे सुरू असलेल्या विशेष कापूस प्रकल्पातील शेतकऱ्यांसाठी कापूस प्रक्षेत्र दिन गाव कोठडे ता. नंदुरबार येथे पार पाडला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सरपंच श्री मनेश गावित, प्रमुख पाहुणे डॉ . हेडगेवार सेवा समितीचे, विश्वस्त मा. श्री. यशपाल भाई पटेल, प्रमुख मार्गदर्शक कृषि विज्ञान केंद्राचे श्री पद्माकर कुंदे, कृषि विभागाचे मंडळ कृषि अधिकारी मा. श्री. ए. डी. पाटील, कृषि सहाय्यक सौ. वसावे मॅडम, IGS संस्थेचे श्री. धनराज वळवी, व प्रकल्पाचे श्री दुर्गाप्रसाद पाटिल श्री. संदिप कुवर उपस्थित होते.
संपूर्ण बातमी वाचा
आज रोजी तूर पिकातील समूह आद्यरेखा प्रात्यक्षिके (कडधान्य) प्रयोग एकात्मीक पिक व्यवस्थापन यात अन्नद्रव्य व्यवस्थापन यावर श्री यु. डी. पाटील, पिक उत्पादन तज्ञ्, तर एकात्मीक किड व्यवस्थापन यावर श्री पद्माकर कुंदे, पिक सरक्षण तज्ञ यांनी सविस्तर मार्गदर्शन केले, त्याच बरोबर हरभरा लागवड तत्रज्ञान यावरही मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.श्री यशपालभाई पटेल, संचालक डॉ. हे.से.स. नंदुरबार यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले, प्रयोगशील शेतकरी श्री राजूदादा वळवी यांनी तूर पिकातील प्रयोगाबद्दल अनुभव् कथन केले, याप्रसंगी मा श्री यशपालभाई पटेल याच्या हस्ते किड नीयंत्रणासाठी निविष्ठा वितरीत करण्यात आल्या तसेंच कार्यक्रमानंतर तूर पिकातील पयोगावर शेत दिनाचे आयोजन करण्यायात आले यात शेतकऱ्यांनी आपले अनुभव सांगितले या कार्यक्रमाला वडदा व कासारे या गावातील शेतकरी मोट्या संखेने उपस्तित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्री प्रवीण चौव्हाण यांनी केले....
माहिती वाचा